आशिया कप 2022 स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात; चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का
आशिया कप 2022 स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघाने आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी हाय व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. आशिया कप आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ते आशिया कप स्पर्धेसाठी जाऊ शकतात की, नाही याबद्दल संशय आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 ऑगस्टला दुबई येथे होणार असून भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. पाकिस्तान ची थरारक बॉलिंग आणि भारताची खतरनाक बॅटिंग हे बघत असताना प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर काटा येतो. त्यामुळे हा सामना लाईव्ह बघताना वेगळीच मजाच असणार आहे. फायनल पेक्षा ही जास्त बघितला जाणाऱ्या ह्या मॅचमध्ये ह्या वर्षी काही तरी मॅजिक मुव्हमेंट्स बघायला मिळतील असे वाटत आहे.
आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
आशिया चषकातील संपूर्ण वेळापत्रक-
शनिवार 27 ऑगस्ट - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
रविवार 28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान ए दुबई
मंगळवार 30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बी शारजाह
बुधवार 31 ऑगस्ट - भारत विरुद्ध पात्र संघ ए दुबई
गुरुवार 1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बी दुबई
शुक्रवार 2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ ए शारजाह
शनिवार 3 सप्टेंबर - ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
रविवार 4 सप्टेंबर - ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
मंगळवार 6 सप्टेंबर - ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
बुधवार 7 सप्टेंबर - ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
गुरुवार 8 सप्टेंबर - ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
शुक्रवार 9 सप्टेंबर - ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
रविवार 11 सप्टेंबर - सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई