सचिवपदी बसताच जय शाह यांचा पाकिस्तानला मोठा झटका, पीसीबीचे होणार आर्थिक नुकसान
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांची आज बीसीसीआयच्या सचिवपदी फेरनिवड झाली. परंतु या पदावर विराजमान होताच जय शाह यांनी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पुढे येणाऱ्या आशिया कप 2023 आधी जय शाहनी पाकिस्तानला झटका दिला आहे. बीसीसीआयच्या एजीएमची आज मुंबईत बैठक झाली. बैठक झाल्यानंतर ते म्हणाले की, काहीही झालं तरी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. असे स्पष्टपणे सांगितले आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या टीम्स टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भिडणार आहेत. या सामन्याला आता फक्त काही दिवस उरलेत. मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला सामना होईल. याआधी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास तयार आहे, जाहीर करण्यात आले होते. जय शाह यांनी आज वृत्त फेटाळून लावले आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध कुठला सामना खेळणार असेल, तर तो तिसऱ्या ठिकाणी होत आहे. हे जय शाह यांनी स्पष्ट केल आहे.
पीसीबीला तिसऱ्या देशात आता टुर्नामेंट आयोजित करावी लागेल
जय शाह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार नाही. अशा स्थितीत पीसीबीला कुठल्या तिसऱ्या देशात टुर्नामेंट आयोजित करावी लागणार आहे. यामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
भारतीय टीम शेवटचं 2005-06 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. टीम इंडियाने पाकिस्तानला वनडे सीरीजमध्ये 4-1 ने हरवलं होतं. 2012 मध्ये शेवटचं पाकिस्तानी टीम भारत दौऱ्यावर आली होती.