Sunil Gavaskar
Sunil Gavaskar

"तो गोलंदाजही बुमराहसारखा आहे"; सुनील गावसकरांनी 'या' गोलंदाजाला म्हटलं दुसरा 'जसप्रीत बुमराह'

भारताच्या या दोन्ही गोलंदाजांनी टी-२० वर्ल्डकपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यूएसविरोधात झालेल्या सामन्यात अर्शदीपने ४ विकेट घेतले. त्यामुळे अर्शदीपला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं.
Published by :
Naresh Shende
Published on

भारताचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. बुमराहने भेदक गोलंदाजी करून भारताला आर्यलँड आणि पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात विजय मिळवून दिला. तर यूएसए विरोधात झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगनेही धमाका केला. भारताच्या या दोन्ही गोलंदाजांनी टी-२० वर्ल्डकपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यूएसविरोधात झालेल्या सामन्यात अर्शदीपने ४ विकेट घेतले. त्यामुळे अर्शदीपला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. अर्शदीपची कामगिरी पाहून सुनील गावसकर यांनी त्याला टीम इंडियाचा दुसरा जसप्रीत बुमराह म्हटलं आहे. दिग्गज गावसकरांनी अर्शदीपची तुलना बुमराहशी केली आहे.

सुनील गावसकर यांनी अर्शदीपबाबत स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटलं, अर्शदीप खेळपट्टीवर चेंडूला योग्य लेंथवर फेकतो. अर्शदीप उजव्या फलंदाजांना स्टंपचा निशाणा बनवतो आणि डावखुऱ्या फलंदाजांपासून चेंडू लांब ठेवतो. अर्शदीपकडे उजव्या आणि डावखुऱ्या फलंदाजांसमोर योग्य लेंथवर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. यूएसएविरोधात झालेल्या सामन्यात अर्शदीप यॉर्कर गोलंदाजी करण्यावर फोकस करत नव्हता. पण योग्य लेंथवर गोलंदाजी करण्याकडे त्यानं लक्ष केंद्रीत केलं होतं.

त्याच्याकडे गोलंदाजीटी शानदार शैली आहे. मला वाटतं, तो बुमराहसारखा रेड बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करेल. जर तो सफेद चेंडूल प्रभावीपणे फिरवू शकतो, तर तो रेड बॉल क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. रेड बॉल क्रिकेटसाठी अर्शदीपचा एक चांगला विकल्प म्हणून निवड समितीने विचार करायला हवा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com