Arjun Tendulkar
Arjun TendulkarTeam Lokshahi

अर्जून तेंडूलकर मुंबईच्या संघात खेळताना दिसणार? मुंबईचे हेड कोच म्हणाले...

निदान या हंगामाचा शेवट तरी मुंबईच्या संघासाठी गोड व्हावा असा मुंबईच्या संघाचा प्रयत्न असणार आहे
Published by :
Vikrant Shinde
Published on

IPLच्या 15व्या हंगामाला (IPL 2022) सुरूवात होऊन आतापर्यंत अर्ध्याहून अधिक सामनेही पार पडले आहेत. तर, या हंगामातून सर्वांत आधी स्पर्धेत बाहेर पडण्याची नामुष्की मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघावर ओढावली आहे. मुंबईच्या संघाची ओळख ही खरंतर IPL मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख आहे. परंतू, यंदाच्या हंगामात मात्र मुंबईच्या संघाला अजुनही सुर गवसलेला दिसला नाही. मुंबईने सुरूवातीचे सलग 8 सामने गमावले आहेत.

आता मुंबईच्या संघाची सुरूवात कडवट झाली असली तरी निदान या हंगामाचा शेवट तरी मुंबईच्या संघासाठी गोड व्हावा असा मुंबईच्या संघाचा प्रयत्न असणार आहे. त्याकरीता मुंबईचा संघ आता खेळाडूंमध्ये काही बदल करणार का असा प्रश्न समोर येत आहे. मुंबईच्या संघामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकरही आहे. त्यामुळे, आता उर्वरीत सामन्यांत तरी अर्जूनला खेळताना पाहण्याची संधी मिळणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यासंदर्भात बोलताना मुंबईच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी सुचक विधान केलं आहे.

काय म्हणाले महेला जयवर्धने?

'सध्या तरी सामने गमावल्याने इतर सामने जिंकून आम्ही गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. याशिवाय उर्वरीत सामन्यात जिंकण्यासाठी संपूर्ण मेहनत करणार असून बेस्ट खेळाडू असलेला संघच आम्ही मैदानात उतरवू. जर अर्जून यातील एक असेल तर नक्कीच त्याला संधी मिळेल. पण अखेर हा निर्णय टीम कॉम्बिनेशनवर अवंलंबून असणार आहे.' असं वक्तव्य महेला जयवर्धने यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com