Tokyo 2020 Hockey : अर्जेंटिनाचा विजय; अटीतटीच्या लढतीत भारताचा पराभव

Tokyo 2020 Hockey : अर्जेंटिनाचा विजय; अटीतटीच्या लढतीत भारताचा पराभव

Published by :
Published on

अर्जेंटिना सोबत झालेल्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. अर्जेंटिनाने २-१ ने हा सामना खिशात घातला. दरम्यान या सामन्यात भारताने चुरशीची लढत दिली. पराभव झाला असला तरी भारताने शेवटच्या क्वार्टरपर्यत कडवी झुंज दिली आहे. दरम्यान भारताचा पराभव झाला असला तरी पदकाची आशा कायम आहे. भारताचा आता कांस्यपदकासाठी ६ ऑगस्टला ब्रिटन सोबत सामना होणार आहे.

उपांत्य सामना सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. अर्जेटिंनाच्या चुकीमुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यानंतर या संधीचे भारताने गोलमध्ये रुपांतर केले. ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत हा गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी घेतल्यानंतर अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाने पहिला गोल केला. त्यानंतर अर्जेंटिनाने गोल करत १-१ बरोबरीत स्कोर आणला. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये दोन्हीही टीमला गोल करता आला नाही. दरम्यान अर्जेंटिनाने २-१ ने हा सामना खिशात घातला.

अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल केले. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला १० मिनिटे शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना गोल करता आला नाही. त्यामुळे अर्जेंटिनाने २-१ ने हा सामना खिशात घातला. भारतासाठी पदकाची आशा कायम आहे. भारताचा आता कांस्यपदकासाठी ६ ऑगस्टला ब्रिटन सोबत सामना होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com