Womens Asia Cup 2024: टीम इंडियासोबतच पाकिस्तानचीही सेमी फायनलमध्ये धडक
महिला आशिया चषक 2024 मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. मंगळवारी 23 जुलै रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने नेपाळसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र नेपाळला भारतीय गोलंदाजांनी बांधून ठेवलं. त्यामुळे त्यांना काहीच करता आलं नाही.
नेपाळला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 96 धावांपर्यंतच धडक मारता आली. नेपाळचा यासह या स्पर्धेतील प्रवास संपला. तर टीम इंडियाने 3 विजयांसह आणि पहिल्या क्रमांकासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शेवटचे 2 सामने हे 24 जुलै रोजी पार पडणार आहेत. त्यानंतर उर्वरित 2 संघ निश्चित होतील. त्यानंतर 26 आणि 28 जुलैला दोन्ही सेमी फायनल सामने होणार आहेत.
वूमन्स टीम इंडिया
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजाना संजीवन.
वूमन्स टीम पाकिस्तान
निदा डार (कॅप्टन), आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजीहा अल्वी, नाशरा संधू, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.