ISSF Shooting विश्वचषकात ऐश्वर्य तोमरची कमाल; सुवर्ण पदकावर साधला निशाणा
नवी दिल्ली : भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह (Aishwary Pratap Singh Tomar) तोमरने आज चांगवान येथे आईएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (ISSF Shooting 2022 World Cup) सुवर्णपदकाला (Gold Medal) गवसणी घातली आहे. ऐश्वर्यने 50 मीटर थ्री पॉझिशन्स स्पर्धेत ही सुवर्ण कामगिरी केली आहे. त्याचे सर्वच स्तरावरुन कौतुक केले जात आहे.
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने हंगरीच्या जलान पेकलर याचा 16-12 ने पराभव करत सुवर्णपदकावर आपलवे नाव कोरले. रॅकींग पेरीत तोमरने पहिली दोन पॉझिशन्यमध्ये आघाडी घेतली. परंतु, अखेरच्या फेरीत सर्व सात गुण गमावले. तर, हंगरीच्या इस्तवानने कांस्य पदक पटकाविले. तत्पुर्वी क्वालिफिकेशनदरम्यानही तोमर 593 अंकानी पहिल्या स्थानावर होता.
दरम्यान, भारताने आईएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 9 पदके जिंकली आहेत. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक आहे आणि पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. यजमान दक्षिण कोरियाने 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले आहे.
याआधी अर्जुन बबुता, शाहू तुषार माने आणि पार्थ माखिजा यांनी कोरियाचा १७-१५ असा पराभव करून १० मीटर एअर रायफलमध्ये टीम सुवर्णपदक जिंकले. या विश्वचषकातील भारताचे तिसरे सुवर्णपदक होते. भारतीय त्रिकुटाने कोरियाच्या स्युंगो बँग, सोंगडो किम आणि हेजुन पार्क यांचा पराभव केला आहे.