Asia cupचा शेवट गोड, पावणे तीन वर्षानंतर झळकावले विराटने शतक
विराट कोहलीचा फॉर्म पुन्हा परतला आहे. आज झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने हे आश्चर्यकारक केले. तब्बल 3 वर्षानंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. या शतकामुळे भारतीय क्रिकेट प्रेमीमध्ये आनंदी उत्साहा आला आहे.
विराट कोहलीने या डावात 61 चेंडूत 122 धावा केल्या. या खेळीत विराटने 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश केला. विराट कोहलीने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या शतका सह विराट कोहलीने आता रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. आता दोन भारतीय सर्वाधिक शतकांच्या यादीत पुढे आहे.
1. सचिन तेंडुलकर (भारत) 664 सामने, 782 डाव, 100 शतके
2. विराट कोहली (भारत) 468 सामने, 522 डाव, 71 शतके
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया/आयसीसी) ५६० सामने, ६६८ डाव, ७१ शतके
३. कुमार संगकारा (श्रीलंका/आशिया/आयसीसी) ५९४ सामने, ६६६ डाव, ६३ शतके