WI VS SA: आफ्रिकेने सलग 7 सामने जिंकून केला विश्वविक्रम! वेस्ट इंडिजला केले बाद

WI VS SA: आफ्रिकेने सलग 7 सामने जिंकून केला विश्वविक्रम! वेस्ट इंडिजला केले बाद

वेस्ट इंडिज विश्वचषक-2024 मधून बाहेर आहे. सुपर 8 सामन्यात दक्षिण आफिक्रेने डकवर्थ लुईस नियनानुसार त्यांचा 3 विकेट राखून पराभव केला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

वेस्ट इंडिज विश्वचषक-2024 मधून बाहेर आहे. सुपर 8 सामन्यात दक्षिण आफिक्रेने डकवर्थ लुईस नियनानुसार त्यांचा 3 विकेट राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत आठ गडी गमावून 135 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफिक्रेची धावसंख्या 2 षटकांनंतर 2 बाद 15 धावा असताना पावसाने व्यत्यय आणला.

सामना सुरू झाला तेव्हा तीन षटके कमी करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेला 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य मिळाले. म्हणजेच त्यांना उर्वरित 15 षटकांत 108 धावा करायच्या होत्या. छोट्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने ही धावसंख्या गाठली. दक्षिण आफ्रिकेने 16.1 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्को यानसेनने 14 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 29 धावांची आणि हेनरिक क्लासेनने 22 धावांची खेळी खेळली.

या विजयासह दक्षिण आफिक्रेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सुपर 8 च्या गट-2 मधून उपांत्य फेरी गाठणारे 2 संघ निश्चिक झाले. दक्षिण आफिक्रा अव्वल, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफिक्रेचा सामना गट-1 मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल, तर इंग्लंडचा सामना गट-1 मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या संघाशी होईल. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 27 जून रोजी होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com