AFG vs BAN: कोहलीला मागे टाकत सचिन तेंडुलकरची केली बरोबरी, अफगाणिस्तानच्या गुरबाजची दमदार कामगिरी

AFG vs BAN: कोहलीला मागे टाकत सचिन तेंडुलकरची केली बरोबरी, अफगाणिस्तानच्या गुरबाजची दमदार कामगिरी

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत, बांगलादेशचे 8 खेळाडू राखून अफगाणिस्तानच्या संघाने 2-1 ने ही मालिका जिंकली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत, बांगलादेशचे 8 खेळाडू राखून अफगाणिस्तानच्या संघाने 2-1 ने ही मालिका जिंकली आहे. तर या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याने आपली दमदार कामगिरी दाखवली आहे त्याने दणक्यात शतके झळकवत नवा विक्रम केला आहे. यावेळी सामना खेळत असताना बांगलादेशच्या संघाने महमुदुल्लाहच्या 98 आणि मेहदी हसन मिराझच्या 66 धावांसह त्यांनी 50 षटकारासह 244 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी 245 धावांचे लक्ष्य दिले. तर अफगाणिस्तानच्या संघाकडून 48.2 षटकांत केवळ 5 खेळाडू गमावून 246 धावा करण्यात आल्या आणि हा सामना अफगाणिस्तान 5 विकेटने जिंकला. तर या सामन्या दरम्यान गुरबाजने टीम इंडियाचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची बरोबरी करत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

कोहलीला मागे टाकत सचिन तेंडुलकरची बरोबरी करण्याचा गुरबाजचा प्रयत्न

रहमानउल्ला गुरबाजने एकदिवसीय शतक झळकवत आपली दमदार कामगिरी दाखवली असून त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. मात्र तो गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान सचिन तेंडुलकरला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे पण त्याने सचिन तेंडुलकर यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरबाजने वयाच्या 22 व्या वर्षी 46 डावांमध्ये 8 वनडे शतके झळकावली आहेत. वयाच्या 22 व्या वर्षी विराट कोहलीने 7 वनडे शतकं झळकवली होती तर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने या वयात ८ शतके झळकवण्याचा विक्रम केला होता. आता गुरबाज सर्वात कमी एकदिवसीय डावात ८ शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

वयाच्या 22 व्या वर्षी एकदिवसीय सामने खेळून सर्वाधिक शतके मारणारे खेळाडू:

रहमानउल्ला गुरबाज : 8 शतक

सचिन तेंडुलकर : 8 शतक

क्विंटन डी कॉक : 8 शतक

विराट कोहली : 7 शतक

बाबर आझम : 6 शतक

उपुल थरंगा : 6 शतक

सर्वात कमी वयात 8 एकदिवसीय शतक गाठण्यासाठी सर्वात कमी डाव:

हाशिम आमला : ४३ डाव

बाबर आझम : ४४ डाव

रहमानउल्ला गुरबाज : ४६ डाव

इमाम उल हक : ४७ डाव

क्विंटन डी कॉक : ५२ डाव

कॅलम मॅक्लिओड: 56 डाव

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com