CWG 2022: अचंता-श्रीजा जोडीने टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर कोरले नाव

CWG 2022: अचंता-श्रीजा जोडीने टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर कोरले नाव

२२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्यात आहे. भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी रविवारी (७ ऑगस्ट) टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

२२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्यात आहे. भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी रविवारी (७ ऑगस्ट) टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांनी शरथ कमलचे त्याच्या कारकिर्दीतील मिश्र दुहेरी प्रकारातील हे पहिला सुवर्णपदक ठरले आहे. तर, राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या २४ वर्षीय श्रीजाचे देखील हे पहिलेच पदक ठरले आहे.

श्रीजाला महिला एकेरीतील कांस्य पदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या यांगझी लिऊविरुद्ध ३-४ असा पराभव पत्करावा लागला होता. शरथ कमलने यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि साथियान ज्ञानसेकरन सोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे. अचंता-श्रीजा जोडीने मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव केला

CWG 2022: अचंता-श्रीजा जोडीने टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर कोरले नाव
CWG 2022: भारतीय मुली रौप्य पदकाच्या मानकरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com