टीम इंडियाच्या 'या' तीन खेळाडूंनी केलीय चमकदार कामगिरी; पण संघात मिळाला डच्चू, जाणून घ्या कारण
3 Indians Players Dropped In T-20 Team: आगामी होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाचा स्क्वॉड नुकताच जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादवकडे टी-२० क्रिकेटसाठी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियासाठी वनडेची कमान सांभाळणार आहे. शुबमन गिलच्या खांद्यावर दोन्ही फॉर्मेटसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात एकाहून एक जबरदस्त खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचे तीन खेळाडू चमकले. पण या खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यासाठी डच्चू देण्यात आला आहे.
अभिषेक शर्मा
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने चार इनिंगमध्ये १२४ धावा केल्या. तसच शर्माने दुसऱ्या टी-२० सामन्यात वादळी शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. तरीही अभिषेक शर्माला आगामी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये जागा मिळाली नाही. यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ऋतुराज गायकवाड
टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडनेही झिम्बाब्वे विरुद्ध धावांचा पाऊस पाडला. तरीही श्रीलंका दौऱ्यासाठी ऋतुराजची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. ऋतुराजने झिम्बाब्वे विरोधात तीन इनिंगमध्ये १३३ धावा केल्या.
मुकेश कुमार
अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडने फलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केली. तर मुकेश कुमारने भारतासाठी भेदक गोलंदाजी करून झिम्बाब्वेविरोधात तीन सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्या. असं असतनाही मुकेश कुमारलाही टीम इंडियात समाविष्ट केलं गेलं नाहीय.
'टी-२० साठी श्रीलंके विरुद्ध भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.