ऑस्ट्रेलियाच्या 'या' बड्या खेळाडूने घेतली निवृत्ती
Admin

ऑस्ट्रेलियाच्या 'या' बड्या खेळाडूने घेतली निवृत्ती

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका सुरु होत आहे. यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कॅप्टनने निवृत्तीची घोषणा केली आहे.ऑस्ट्रेलियन संघाचा टी-20 कर्णधार आरोन फिंचने निवृत्ती जाहीर केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वनडे कर्णधारपदाची निवृत्ती जाहीर केली होती. फिंचने ऑस्ट्रेलियाचे सर्व फॉरमॅटमध्ये 254 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.फिंच हा टी-20 फॉरमॅट क्रिकेटचा स्टार खेळाडू होता आणि त्याला 2020 मध्ये ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निवृत्तीबद्दल आरोन फिंच म्हणाला की, मी 2024 च्या पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत खेळणार नाही, हे लक्षात घेऊन, पद सोडण्याची आणि त्या स्पर्धेसाठी संघाला वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे.माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्या चाहत्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचेही मी खूप आभार मानू इच्छितो. असे त्याने म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com