SRH VS RCB: रोमांचक सामन्यात SRHचा जबरदस्त विजय; तर RCBची हार
आयपीएलच्या 30 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळण्यात आला. दोन्ही संघातील हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या होम ग्राउंड एन चिन्नस्वामी स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात आरसीबीने विजयाची नोंद करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु अखेरीस संघ 25 धावांनी मागे पडला आणि त्यांना आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादने ट्रेव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 3 बाद 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात आरसीबीनेही शानदार फलंदाजी केली, परंतु लक्ष्य इतके मोठे होते की संघ 25 धावांनी मागे राहिला. आरसीबीला 20 षटकात 7 विकेट्सवर केवळ 262 धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 43 धावांत तीन बळी घेतले.
आयपीएलच्या चालू मोसमात हैदराबादने इतक्या धावा करण्याची ही दुसरी वेळ होती. सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध शानदार फलंदाजी करत आपलाच विक्रम मोडला आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग 11 :
फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11 :
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.