MI VS PBKS: या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दमदार विजय; तर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव

MI VS PBKS: या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दमदार विजय; तर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव

IPL 2024: आयपीएल 2024चा 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Indian Premier League 2024: आयपीएल 2024चा 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 183 धावांत सर्वबाद झाला. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराबव केला आणि गुणतालिकेत 7वे स्थान मिळवले. आता संघाच्या खात्यात 6 गुण आहेत तर पंजाब संघ 6 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात डळमळीत झाली. संघाने 14 चेंडूत चार विकेट गमावल्या होत्या. पाचवा धक्का हरप्रीत सिंगच्या रूपाने बसला जो केवळ 13 धावा करू शकला. या सामन्यात सॅम कुरनने सहा, प्रभसिमरन सिंगने शून्य, रिले रुसोने एक धाव आणि लियाम लिव्हिंगस्टोनने एक धावा काढल्या. या सामन्यात हरप्रीत सिंग आणि शशांक सिंग यांच्यात 35 धावांची भागीदारी झाली. शशांकने दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या.

मुंबईविरुद्ध आशुतोष शर्माने आक्रमक कामगिरी केली. त्याने अवघ्या 28 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 217.85 च्या स्ट्राइक रेटने दोन चौकार आणि सात षटकार मारले. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मुंबईतर्फे आकाश मधवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पंजाब सहज विजय मिळवेल असे वाटत असताना पंजाबने शेवटची विकेट शेवटच्या षटकात गमावली आणि मुंबईने आपला तिसरा विजय मिळवला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग 11):

रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11):

रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com