T-20 World Cup 2024: सुपर-8 चे पूर्ण वेळापत्रक, बरीच नाराजी असू शकते, सर्वांच्या नजरा 'या' चार सामन्यांवर

T-20 World Cup 2024: सुपर-8 चे पूर्ण वेळापत्रक, बरीच नाराजी असू शकते, सर्वांच्या नजरा 'या' चार सामन्यांवर

T20 विश्वचषक 2024 चा ग्रुप स्टेज संपणार आहे. आतापर्यंत 33 सामने जाले असून या सामन्यात आणखी 7 सामने बाकी आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

T20 विश्वचषक 2024 चा ग्रुप स्टेज संपणार आहे. आतापर्यंत 33 सामने जाले असून या सामन्यात आणखी 7 सामने बाकी आहेत. मंगळवारी वेस्ट इंडिड आणि अफगानिस्तान यांच्यातील सामन्याने ग्रुप स्टेजचा शेवट होईल. आतापर्यंत तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये दोन निकाल लागले आहेत. सुपर-8 फेरी 19 जूनपासून सुरू होणार आहे. या विश्वचषकात 20 संघ खेळण्यासाठी आले होते, ज्यांची प्रत्येकी पाच गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 मध्ये पोहोचतील.

आतापर्यंत सुपर-8 चे सहा संघ निश्चित झाले आहेत. आणखी दोन संघ निश्चित करायचे आहेत. मात्र, या T20 विश्वचषकात काही मोठे अपसेटही पाहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तानने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघांना चकित केले, तर अमेरिकेने पाकिस्तान संघाला आश्चर्यचकित केले. यावेळी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकासारखे काही माजी चॅम्पियन संघ सुपर-8 मध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी अमेरिका आणि अफगाणिस्तानसारख्या नव्या आणि बलाढ्य संघांनी आपले स्थान निर्माण केले आहे.

सुपर-8 फेरीची सुरुवात 19 जून रोजी अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होईल. या फेरीत दोन गट आहेत. एका गटातील एक संघ तीन सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-8 फेरीचे सीडिंग स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच निश्चित झाले होते.

प्रथम स्पर्धेपूर्वी दिलेले सीडिंग पाहूया

गट

A1: भारत, A2: अमेरिका

गट-B

B1: द्वितीय पात्रता संघ, B2: ऑस्ट्रेलिया

गट- C

C1: अफगाणिस्तान, C2: वेस्ट इंडिज

गट-D

D1: दक्षिण आफ्रिका, D2: दुसरा पात्रता संघ

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com