७०व्या अखिल भारतीय रेल्वे कबड्डी स्पर्धेला मुंबईत सुरुवात
मध्य रेल्वेतर्फे दि. २६.१२.२०२२ ते २९.१२.२०२२ या कालावधीत रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, परळ, मुंबई येथे ७०वी अखिल भारतीय रेल्वे कबड्डी स्पर्धा आयोजित केली जात आहे. आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि प्रमुख पाहुणे यांनी दि. २६.१२.२०२२ रोजी मध्य रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, परळ येथे उद्घाटन समारंभात ७०व्या अखिल भारतीय रेल्वे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले.
मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA) द्वारे ४ दिवसीय चॅम्पियनशिप आयोजित केली आहे. या चॅम्पियनशिपमध्ये विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे एकूण १५ संघ सहभागी होत आहेत. प्रो कबड्डी लीगचा भाग असलेले संपूर्ण भारतातील तब्बल ४८ खेळाडू या चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहेत. मध्य रेल्वे संघाने २ सेटमध्ये आरपीएफ संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रंगतदार रंगत आणली आहे.
या कार्यक्रमादरम्यान श्री मनोज शर्मा, अध्यक्ष मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA) आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण), श्री रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, श्री ध्रुवज्योती सेनगुप्ता, सरचिटणीस, सीआरएसए आणि आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी (वाहतूक) तसेच मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA)चे इतर पदाधिकारी आणि विभागीय मुख्यालय व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.