WTC Final Day 6 Live : न्यूझीलंडसमोर 139 धावांचे लक्ष्य
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 139 धावांची गरज आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. लेथम आणि कॉन्वे यांनी न्यूझीलंडकडून फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंड हे आवाहन पूर्ण करते कि हा सामना अनिर्णीत राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होऊन काही वेळातच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाठोपाठ चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्यानंतर पंत आणि रहाणे मिळून खेळ सावरत असतानाच रहाणेही बाद झाल्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली. त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये भारताला आधी रवींद्र जाडेजाच्या रुपात पहिला झटका मिळाला. त्यानंतर एकहाती सामना पुढे घेऊन चाललेला पंतही 41 धाव करुन बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये आश्विनही बाद झाला आणि काही वेळातच शमी आणि बुमराह लागोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव 170 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला आता विजयासाठी केवळ 139 धावा करण्याची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – सर्वबाद २१७ (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९ काईल जेमीसन ५/३१)
भारत दुसरा डाव – सर्वबाद 170 (ऋषभ पंत ४१, टिम साऊदी ४/४८)
न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद २४९ (डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यमसन ४९ मोहम्मद शमी ४/७६)