MI vs RR : मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं लक्ष्य

MI vs RR : मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं लक्ष्य

Published by :
Published on

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट्स गमावून 171 धावांची खेळी केली आहे. आता मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान असणार आहे.

राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. जोस बटलरने 41 तसेच शिवम दुबेने 35 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वलाने 32 धावांची खेळी केली. यामुळे राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 171 धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चाहरने 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर राजस्थानची स्थितीही तशीच आहे राजस्थाननं पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत वर येण्याच्या प्रयत्नात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com