Social Media Platforms blocked in sri lanka
Social Media Platforms blocked in sri lankaTeam Lokshahi

श्रीलंकेत फेसबूक, ट्विटर, व्हाट्सअपसह १० सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद!

आणीबाणी, कर्फ्युनंतर श्रीलंकेच्या सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

श्रीलंका सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, देशातील परिस्थिती सध्या नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. श्रीलंकेत ठिकठिकाणी लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून, परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी सरकारने आणीबाणी (Emergency in Sri Lanka) लागू केली आहे. त्यानंतर आता श्रीलंकेतील सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Economic Crisis in Sri Lanka)

श्रीलंकेत अनेक मोठ्या शहरांत लोक रस्त्यावर उतरले असून, जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडत असल्याचं समोर येतंय. लोकांना खाण्यापिण्यापासून ते प्रत्येक जीवनावश्यक वस्तुसाठी झगडावं लागत असल्यानं लोकांमध्ये सरकारविरोधात अराजकता निर्माण झाली आहे. देशाच्या सध्याच्या परिस्थितीसाठी सत्तेत असलेल्या सरकाची रणनिती जबाबदार असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून, कोलंबोच्या आसपासच्या परिसरात कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेच्या सरकारने सोशल मिडीया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार विरोधात निर्माण झालेल्या रोषामुळे अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्म बंद केले आहेत.फेसबूक, ट्विटर, व्हाट्सअपसह १० सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी ही जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी लागू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com