Social media | तुमचे पण फेक आकाऊंट आहे? तर हि बातमी नक्की वाचा
सोशल मीडियाचा वापर करत नसेल असा व्यक्ती आता भारतात शोधुनही सापडणार नाही. पण आपल्याला सामान्य व्यक्तीला बॉलिवूड कलाकारांचे फोटो असलेले आकाऊंट पन नाव मात्र भलतेच असाच काहीसा प्रकार अनेकांना पाहायला मिळतो. कधी-कधी आपल्याच नावाचे आपल्याच फोटोचे दुसरे आकाऊंट सुद्धा पाहायला मिळते. पण हा सामाजिक गुन्हाच आहे.
भारत सरकाने या संबंधित महत्वाचे पाऊल उचलले आहे. जर सोशल मीडियावर आकाऊंटला प्रसिद्ध व्यक्तींचे किंवा स्वतःव्यतिरिक्त इतरांचे फोटो आहेत अशांवर कारवाई होणार आहे. ज्या व्यक्तीच्या नावे खोटे आकाऊंट आहे त्या स्वतः किंवा इतर कोणीही तक्रार केल्यास २४ तासांमध्ये ही कारवाई होणार आहे.
सरकारने फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम, युट्यूब अशा सर्व सोशल मीडिया कंपन्यांना हा नियम सक्तीचा केला आहे. सरकारकडून सांगण्यात आले की हा नियम माहिती तंत्रज्ञान कायद्याचाच भाग असेल. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार आल्यानंतर त्वरीत कारवाई करावी लागेल.