छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; शुभम शेळकेसह, अंकुश केसरकरची जेलमधून सूटका
नंदकिशोर गावडे, बेळगाव | छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी निषेध व्यक्त करणाऱ्या बेळगाव मधील एकूण 38 जणांना राजद्रोहच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. आता या प्रकरणात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके व उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांची हिंडलगा जेलमधुन सुटका करण्यात आली आहे.
बंगळूरूत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याची निंदनीय घटना घडली होती.या घटनेनंतर निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या बेळगाव मधील एकूण 38 जणांना राजद्रोहच्या गुन्हात अडकवण्यात आलेलं होत. याअगोदर हनशी येथील तीन तरुणांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आज उशिरा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके व उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांना अनेक अटी व शर्तीसह हिंडलगा जेलमधुन सुटका करण्यात आली आहे.
शुभम शेळके व अंकुश केसरकर यांच्यावर अनेक केसेस असल्याने जामीन अर्ज हे गेले दीड महिना फेटाळले जात होते. मात्र आज अखेर पुन्हा दोघांची सुटका झालेली आहे. उर्वरीत रमाकांत कोंडूसकनानंसह 36 मराठी तरुण हे अद्याप कारागृहातचं आहेत.