Crime Scene
Crime Scene

मुंबईमधील धक्कादायक प्रकार; १०० रुपयांसाठी केली मित्राची हत्या

Published by :
Published on

मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिसरमध्ये एका मित्राने चक्क शंभर रुपयांसाठी मित्राची हत्या केली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. 

ज्या व्यक्तीने ही हत्या केली तिनेच फोन करुन पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केलीय.

परमेश्वर कोकाटे या तरुणाने ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. गॅरेजमध्ये एक व्यक्ती जळलेल्या अवस्थेत पडलेला होता. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनात असे लक्षात आले की गळा आवळल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com