‘हेच का अच्छे दिन?’

‘हेच का अच्छे दिन?’

Published by :
Published on

सुरज दाहाट, अमरावती
2014ला सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल पेट्रोलचे दर कमी होऊन सर्वसामान्यांचे अच्छे दिन येतील असे आश्वासन जनतेला दिले होते. परंतु मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलची झालेली दरवाढ ही सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आल्यामुळे केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहे. राज्यातही शिवसेनेकडून व युवा सेनेकडून वारंवार 'हेच का अच्छे दिन?' असा प्रश्न भाजपला विचारला जात आहे. आता अमरावतीमध्ये युवासेनेच्यावतीने ठिकाणी बॅनर लावून 'हेच का अच्छे दिन? पेट्रोल-डिझेलच्या किमती केव्हा कमी होणार?' असा सवाल युवासेनेकडून अमरावतीमध्ये विचारण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com