Uncategorized
पावसाळी अधिवेशन २०२१ | शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला पार पडत आहे. यासाठीच शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप सेनेच्या वतीने जारी करण्यात आलाय.
या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी जारी केला आहे.