गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मते
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (ShivSena)दारुण पराभव झाला आहे. शिवसेनेला एकही जागा राखता आलेली नाही. उलट नन ऑफ दि अदर (NOTA) या पर्यायाला शिवसेनेपेक्षा अधिक मत मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. गोव्यात पक्ष वाढवण्याच्या शिवसेनेचे व संजय राऊत यांच्या स्वप्नांना यामुळे सुरुंग लागला आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, गोव्यात शिवसेनेला एकूण मतदान केवळ ०.१९ टक्के इतकं झालं आहे. गोव्यात १,५२२ इतकी एकूण मतं शिवसेनेला मिळाली आहेत. तर कुठलाही उमेदवार नकारण्याचा पर्याय असलेल्या नोटाला १.१३ टक्के मतं मिळाली आहेत, यामध्ये एकूण ९,०९६ मतांचा समावेश आहे. राष्ट्रवादीला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत.
गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण शिवसेनेचे होते. मात्र त्यात अपयशी ठरले. गोव्यात शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला हार पत्करावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी टीका रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी केली.
https://lokshahi.live/assembly-election-result-2022-state-wise-vidhan-sabha-seats-counting-2/