अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मीडिया विरोधात हायकोर्टात धाव

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मीडिया विरोधात हायकोर्टात धाव

Published by :
Published on

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी पती राज कुंद्रा अटकेत असतानाच आता बॉलिवूड अभिनेत्री व पत्नी शिल्पा शेट्टीने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिल्पाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी आणि २५ कोटी रूपयांची मानहानीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राज कुंद्रांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज कुंद्रांचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्रांच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com