Sensex 554 अंकांनी तर Nifty 195 अंकांनी खाली
शेअर बाजार (Share Market Today) मंगळवार, 18 जानेवारी रोजी खूपच घसरला. शेअर मार्केट बंद होताना आज सेन्सेक्स 554 अकांनी घसरला आहे तर निफ्टीही 195 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.90 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,754.86 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.07 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,113 वर पोहोचला आहे. आज 1007 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2218 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 59 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, आयटी, कॅपिटल गुड्स,मेटल, रिअॅलिटी आणि फार्मा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलंय. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Tata Consumer Products, Maruti Suzuki, UltraTech Cement, Eicher Motors आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Axis Bank, HDFC Bank, Dr Reddy's Labs, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
Axis Bank- 1.76 टक्के
HDFC Bank- 0.51 टक्के
ICICI Bank- 0.46 टक्के
Dr Reddys Labs- 0.45 टक्के
Kotak Mahindra- 0.24 टक्के