Sharad Pawar | दिल्लीतील भेटीनंतर पंतप्रधान मोदींना पवारांचे पत्र

Sharad Pawar | दिल्लीतील भेटीनंतर पंतप्रधान मोदींना पवारांचे पत्र

Published by :
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

जवळपास 50 मिनिटांच्या या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही तर सहकार मंत्रालय आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना आणखी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी सहकार मंत्रालयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्र हा राज्याचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केंद्राकडून कोणताही हस्तक्षेप हा संविधानाच्या नियमांचे उल्लंघन असेल, असे यामध्ये म्हणण्यात आलं आहे.

कायद्यातील तरतुदींमध्ये असलेल्या त्रुटींमुळे 97 वी घटनादुरुस्ती वादात असल्याचंही शरद पवार यांनी या पत्रात नमूद केलं आहे. अलिकडच्या काळात सहकारी बँकांच्या क्षेत्रात झालेल्या बदलाबाबत शरद पवार यांनी या पत्रामध्ये मुद्दे उपस्थित केले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com