‘लखीमपूरमध्ये जालियानवाला बागसारखी स्थिती, देशातील शेतकरी भाजपाला सडेतोड उत्तर देईल’

‘लखीमपूरमध्ये जालियानवाला बागसारखी स्थिती, देशातील शेतकरी भाजपाला सडेतोड उत्तर देईल’

Published by :
Published on

उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनात ९ जणांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण देशभरात याचे तीव्र पडसाद उमटायला लागले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो असं म्हणत पवारांनी भाजपाला जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले पवार?

शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत सुरू होतं. शेतकऱ्यांवर हल्ला झाला त्याची प्रतिक्रिया देशभर उमटली. लोकशाहीत शांतीपूर्ण मार्गानं आपली बाजू मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तोच अधिकार लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी वापरला. शेतकरी शांततेत आंदोलन करत असताना शेतकऱ्यांवर केंद्र सरकार किंवा यूपी सरकारनं गाडी चालवून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. यात अनेकांचा मृत्यू झाला. हे दुर्दैवी आहे, असं पवार म्हणाले.

देशभरातील शेतकरी भाजपाला उत्तर देईल

शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. केवळ निषेध करून शांती होणार नाही, तर याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे याप्रकरणाची चौकशी द्यावी आणि त्यातील सत्य बाहेर यावं. भारत सरकारची नियत यातून स्पष्ट होते. केंद्र सरकारनं सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होणार नाहीत. केवळ यूपी नाही तर देशभरातील शेतकरी भाजपाला याचं उत्तर देतील, असा इशाराही पवार यांनी दिला.

आज ना उद्या भाजपाला याची किंमत मोजावी लागेल –

दुध का दुध पाणी का पाणी झालं पाहिजे. सत्तेचा हा गैरवापर असल्याचा गंभीर आरोपही पवार यांनी केला. या घटनेची जबाबदारी भाजपाची आहे. विरोधी पक्षांनी यावर भूमिका स्पष्ट करावी. सरकार संवेदनशील नाही. केवळ दु:ख व्यक्त करायची पण त्यांची तयारी नाही. जालियानवाला बागसारखी स्थिती उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. आज ना उद्या सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असंही पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com