पवारांचा सरकारला सल्ला, धाडसाने निर्णय घ्या…
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार (mva government)आणि भाजप (bjp)मध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. या आरोप प्रत्यारोपांमध्ये राजकारणातील सर्व मर्यादांचे उल्लंघन झाले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे गुरु शरद पवार (sharad pawar)यांनी सरकारला सल्ला दिला. पवार म्हणाले, लोकांच्या कामाला गती द्या, धाडसाने निर्णय घेत कामाला सुरुवात करा' असा कानमंत्र पवारांनी दिला.
मुंबईतील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा आज शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला.
शरद पवार म्हणाले की, 'ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असे उपक्रम घेता येईल, तिथे नक्की हे उपक्रम घ्या. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील जनता तुमच्या पाठीमागे उभी आहे.
पोलिसांसाठी घरे करा
पवार यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे कौतूक केले. तसेच पोलिसांसाठी घरे करण्याचे सूचना केली. ते म्हणाले, 'आपले रक्षण करणारा पोलीस कर्मचारी हा राज्याचा मुख्य घटक आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा घराचे प्रश्न मार्गी लाव. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांचे क्वार्टर हे चांगले नाही. पोलीस कर्मचारी १६-१६ तास काम करतात पण त्यांना चांगला निवारा नाही. त्यामुळे पोलिसांनी हक्काचे घर मिळाले पाहिजे. सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली.