आता ‘या’ दरात मिळणार ‘कोव्हिशिल्ड’ लस

आता ‘या’ दरात मिळणार ‘कोव्हिशिल्ड’ लस

Published by :
Published on

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयं यांना प्रतिडोस अनुक्रमे ४०० व ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

राज्य सरकारांना ४०० प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस कोविशिल्ड देण्यात येईल. मात्र, केंद्र सरकारला १५० रुपये प्रतिडोस या दरानेच पुरवठा केला जाईल. दोन महिन्यांत लस उत्पादनाला वेग देण्यात येईल, असेही म्हटले आहे.

केंद्राच्या धोरणानुसार सीरम व भारत बायोटेक यांच्याकडून उत्पादित होणाऱ्या लसींपैकी ५० टक्के लसी केंद्रासाठी राखीव असतील तर उर्वरित ५० टक्के साठा राज्ये आणि खासगी रुग्णालये यांच्यासाठी राखीव असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com