Stock Market | सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६२०००चा टप्पा; तर निफ्टी १८,६०२ च्यावर झाला बंद
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजी पहायला मिळत आहे. काल सेन्सेक्सने 61,800 चा टप्पा गाठला होता. तर आज त्यापुढे जात आता 62 हजारांचा टप्पा पार केला आहे. सेन्सेक्स सध्या 62,111.64 वर आहे. तब्बल 346.05 अंशांची उसळी सेन्सेक्सने मारली आहे. दसऱ्याच्या नंतर आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही तेजी पहायला मिळत आहे.
शेअर बाजार आज पुन्हा एका नवीन उच्चांकासह उघडला असून बीएसईचा 30-स्टॉकचा निर्देशांक सेन्सेक्स ३९०.८९ अंकांसह ६२,१५६.४८ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १८,६०२.३५ च्या नवीन विक्रमासह व्यापार सुरु झाला आहे.
आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मजबूत तेजीचा कल आजही कायम आहे. गेल्या ५ सत्रांमध्ये तो सुमारे ३० टक्क्यांनी वाढून ६२८४ रुपयांवर पोहोचला आहे. एनएसइवर आज तो ६१४०.३० रुपयांवर उघडला आणि सकाळी ९.३० पर्यंत ६३३४ च्या पातळीला स्पर्श केला. एल अँड टी, विप्रो, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व सुरुवातीच्या व्यापारात निफ्टीच्या सर्वाधिक लाभधारकांच्या यादीत होते. आयटीसी, एस्कॉर्ट्स मोटर्स, अल्ट्राटेक, आयओसी आणि टाइट सारखे स्टॉकमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.