Section 370 | दोन वर्षांत काश्मिरमध्ये काय बदल झालेत?

Section 370 | दोन वर्षांत काश्मिरमध्ये काय बदल झालेत?

Published by :
Published on

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी २०१९ मध्ये काश्मिरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला होता. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-काश्मीर आणि लडाख) विभागले. गुरुवारी या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात जम्मू-काश्मीरसंबंधी काही महत्त्वाचे बदल…

स्थानिक निवासी दर्जा : जम्मू-काश्मिरचा रहिवाशी बनण्याच्या नियमांमध्ये बदल करत इतर राज्यातील पुरुषांना याठिकाणी स्थायिक होण्याचा नियम करण्यात आला आहे.

जमीन खरेदी शक्य : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर बाहेरील लोकांना बिगर-कृषी योग्य जमीन खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. याआधी जम्मू-काश्मीरच्या लोकांनाच जमीन खरेदी करण्याची परवानगी होती.

सरकारी इमारतींवर तिरंगा : कलम-३७० हटवल्यानंतर २० दिवसांनी श्रीनगरच्या सचिवालयातून जम्मू-काश्मीरचा झेंडा काढून तेथे तिरंगा फडकवण्यात आला.

दगडफेक करणाऱ्यांना पासपोर्ट नाही : नुकतेच केंद्र शासित प्रदेश सरकारने आदेश जारी केलाय की, दगडफेक आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी लोकांना पासपोर्ट दिला जाणार नाही. तसेच सरकारी नोकऱ्यांपासून त्यांना वंचित ठेवलं जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com