शरद पवार यांनी अजित पवारांच्या भाजपसोबतच्या भूमिकेवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की विचारधारेच्या बाबतीत तडजोड न करता, मूळ विचारसरणी स्वीकारल्यास कुणाचीही अडवणूक होणार नाही.
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र, राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या 55 जाहीरसभा होणार आहेत. पुढील दोन आठवड्यात शरद पवार यांच्या 55 सभांचं नियोजन करण्यात आलं आहे.