SBI Important Notice: आज UPI पेमेंट करता येणार नाही

SBI Important Notice: आज UPI पेमेंट करता येणार नाही

Published by :
Published on

जर तुम्ही भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल आणि आपण UPI मार्फत पैसे भरले तर आज तुम्हाला UPI पेमेंट करण्यात अडचण येऊ शकते. SBI ने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक आज आपले यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करणार आहे त्यामुळे, 4 मार्च रोजी बँक ग्राहकांना UPI व्यवहारात अडचण येऊ शकते. जेणेकरुन ग्राहकांना चांगली सेवा देता येईल. देशभरात एसबीआयचे 44 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.

UPI पेमेंटना बँकेने अनेक पर्याय दिले आहेत. बँकेने म्हटले आहे की, ग्राहक योनो अ‍ॅप, योनो लाइट अ‍ॅप , नेट बँकिंग किंवा एटीएम वापरू शकतात. बँकेने दिलेल्या माहितीनुसार एसबीआय युझर्स पर्याय म्हणून बँकेची अन्य डिजिटल चॅनेल वापरू शकतात. एसबीआयच्या ट्विटनुसार, यूपीआयमध्ये अपग्रेडेशन केल्यामुळे या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.

युपीआय सर्व्हिस थांबविण्यासाठी ग्राहक टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर 1800111109 किंवा आयव्हीआर क्रमांकावर 1800-425-3800 / 1800-11-2211 वर कॉल करू शकतात असे बँकेने म्हटले आहे. या व्यतिरिक्त https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ वर कोणी तक्रार देऊ शकते. तसेच आपण 9223008333 या क्रमांकावर एसएमएस पाठवून तक्रार सांगू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com