SBI Alert : बँकेच्या सुरळीत व्यवहारांसाठी आताच अपडेट करा ‘ही’ माहिती
लोकशाही न्यूज नेटवर्क
SBI बँकेने बँकेच्या व्यवहारांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे .आंतरराष्ट्रीय व्यवहारात करताना अडचण येत असेल तर ताबडतोब तुमच्या पॅनकार्डसंबंधित माहिती बँकेला द्या अशी अधिसूचना देशाबाहेरील ग्राहकांसाठी बँकेने जारी केली.
एसबीआयने ट्वीट करून यासंबंधी एक माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, एटीएम, पीओएस / ई-कॉमर्सद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी आपले एसबीआय डेबिट कार्ड वापरण्यासाठी बँकेत पॅन कार्डची माहिती अपडेट करा असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
खात्यातशी कसे जोडाल पॅनकार्ड ?
यासाठी www.onlinesbi.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन My Accounts ऑप्शन निवडा आणि Profile-Pan Registration वर क्लिक करा.यानंतर एक नवं पान उघडलं जाईल. यामध्ये जर तुमचं पॅन खातं आधीपासूनच बँक खात्याशी लिंक असेल तर तसं तुमच्या स्क्रिनवर दिसेल. जर खातं पॅनशी जोडलेलं नसेल तर तुम्हाला खाते क्रमांक विचारला जाईल. यावर, खाते क्रमांक निवडा आणि तिथे दर्शविलेल्या पर्यायामध्ये पॅन नंबर भरा. यानंतर सबमिट करा. या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पॅन नंबर जोडू शकता.