संजय राठोड यांना क्लिन चिट, महिलेच्या जबाबानंतर सुटका

संजय राठोड यांना क्लिन चिट, महिलेच्या जबाबानंतर सुटका

Published by :
Published on

यवतमाळमधील महिलेने केलेल्या आरोपानंतर संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाली आहे. महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यानंतर संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकाने शहानिशा केली होती. तसेच जबाब नोंदवण्यात आला होता. अखेर संबंधित महिलेच्या जबाबावरून हे प्रकरण मिटल्याचं चित्र आहे.

यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने घाटंजी पोलीस व पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठवले होते. त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष तपास पथकाने दोन तास या महिलेची चौकशी केली होती.

मात्र ही तक्रार आपण केली नाही. सही माझी नाही, असे या महिलेने सांगितले. संजय राठोड यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार केली नाही, असे जबाबात नोंदवण्यात आले. यामुळे एका प्रकरणात संजय राठोड यांना दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com