हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक; सांगलीत मस्जिदमधील गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा कायम

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक; सांगलीत मस्जिदमधील गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा कायम

Published by :
Published on

संजय देसाई | सांगलीत हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक दिसून आले आहे. सांगलीतील गोटखिंडी येथील मस्जिद मधील गणपतीची चाळीस वर्षांपासूनची परंपरा कायम आहे.

वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात गेली चाळीस वर्षांपासून हिंदू मुस्लिम बंधू एकत्र येऊन मस्जिद मध्ये गणपती बसवत आहेत. न्यू गणेश तरुण मंडळाने, 1981 साली पहिल्यांदा गणपती बसवण्याची परंपरा सुरु केली. मात्र त्यावेळी पाऊस आल्याने मूर्ती मस्जिद मध्ये बसवण्यात आली. तेव्हा पासून आज पर्यंत गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत मस्जिदमध्ये गणपती बसवत आहेत. तर या दरम्यान गणेश चतुर्थी आणि मोहरम पंजा आला तर एका मस्जिद मध्येच गणपती आणि मोहरम सन एकत्र साजरा करतात.

गेल्या चाळीस वर्षांपासून गणेश उत्सवात मुस्लिम बांधव कोणत्याही प्रकारे मांसाहार करत नाहीत. यामुळे या गावात खऱ्या अर्थाने दोन्ही समाजामध्ये एक्याचे दर्शन घडते आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com