रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीत, जोरदार धुमश्चक्री
रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine war)केलेल्या हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. शनिवारी राजधानी किवसह युक्रेनच्या (Ukraine) सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाले. रशियन (Russia)सैन्याने राजधानी किवमध्ये प्रवेश केला असून युक्रेनच्या सैन्याशी जोरदार युद्ध सुरू झाले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर केला होता. या प्रस्तावाच्या बाजूने 11 तर विरोधात 1 मते पडली. भारत, चीन आणि यूएई या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. तथापी, रशियाने हा निषेध प्रस्ताव फेटाळण्यासाठी व्हेटोचा वापर केला. दरम्यान, रशियाने हल्ले थांबवावेत , अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशार NATO ने दिला आहे.
आंतरराष्ट्रीय दबावानंतरही रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान युक्रेनवर कब्जा करण्याचा रशियाचा कोणताही इरादा नसल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. युक्रेनियन सैन्याने शस्त्रे ठेवल्यास मॉस्को वाटाघाटी करण्यास तयार आहे. युक्रेनने रशियन विमान पाडल्याचा दावा केला आहे. या विमानात 150 रशियन पॅराट्रूपर्स होते. किती मारले गेले आणि किती वाचले.. ही माहिती देण्यात आलेली नाही.
रशियाने युक्रेन सोबत लढाई सुरू केल्यानंतर तिथे MBBS च्या शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडचणीत आलेले आहे. यात अमरावती जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र युक्रेन मधील भारतीय दूतावास व भारत सरकारने तातडीने पावले उचलत युक्रेनच्या चर्नोव्हस्की व आसपासच्या भागातील 270 च्यावर विद्यार्थ्याना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात नेले आहे. रोमानियाच्या बोर्डरवर रोमानियन जनतेने भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली आहे.अमरावती येथील साहिर तेलंग या विद्यार्थ्याने तेथील दृश्ये पाठवली आहेत. भारत सरकारने तातडीने पावले उचलल्याने व सर्व विद्यार्थ्यांची युक्रेनवर आणण्याची मोफत व्यवस्था करण्यात आल्याने भारत सरकार व युक्रेनमधील भारतीय दूतावासाचे आभार मानले आहे उद्या किंवा परवा या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे.
पेट्रोल, डिझेलमध्ये दरवाढ
रशिया ऊर्जा क्षेत्रातील सर्वात डॉलरवर पोहोचल्या आहेत. येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. कच्च्या तेलाचे दर अचानक वाढल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.