Russia Ukraine crisis
Russia Ukraine crisis

Russia-Ukraine war | यूक्रेनविरोधात रशियाची युद्धाची घोषणा; कीवमध्ये अनेक Blast

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

रशिया आणि युक्रेनमधील वादाची (Russia Ukraine Conflict) ठिणगी आरपार झाली असून यूक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग अधिक दाटले आहेत.रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात सूड उगवणार असल्याच जाहीर वक्तव्य केलं आहे. तसेच या कारवाईत कोणीही हस्तक्षेप केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचं वचन दिलं आहे. राजधानी कीव मध्ये बॉम्ब हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. तर व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवायला सांगितलं आहे.

रशियाने युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) लष्करी कारवाईची घोषणा केलीय. यामुळे युद्धाचा भडका उढण्याची शक्यता आहे. रशियाने अशी घोषणा केली असताना अमेरिका, युरोपसह इतर देश युक्रेनच्या पाठिशी आहेत. रशियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

रशियाकडून हल्ला झाल्यास त्याला इतर देश प्रत्युत्तर देतील असाही इशारा रशियाला अमेरिकेसह इतर देशांनी दिला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रशियन लष्कराकडून युद्धाची तयारी करण्यात आली होती. युक्रेनला अमेरिका, युरोपिय देशांकडून पाठिंबा दिला जात आहे. तर रशिया मात्र सध्या एकाकी पडल्याचं चित्र आहे.

रशियाने युक्रेनचे दोन तुकडे पाडले
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कायम आहे. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले होते. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार घेतलेली नाही. युद्धाची घोषणा केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com