Russia Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या घराजवळ रॉकेट हल्ला
युक्रेनवर रशियाकडून हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशियन सैन्याने युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त केले आहे. रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू आहेत. अशातच रशियाकडून वारंवार युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की (President Zhelensky of Ukraine) यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरु आहेत. शनिवारी राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या घराजवळ रॉकेटचे काही भाग आढळून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती निवास स्थानाला मिसाईल हल्ल्याने उडवून देण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जातेय. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितनाही झालेली नाही तसेच राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचेही नुकसान न झाल्याचे समजत आहे.
स्वत: राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की (President Vladimir Zhelensky) यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या या रॉकेटवर भाष्य केले आहे. रशियाचा निशाणा चुकला असल्याचे सांगत त्यांनी याआधीदेखील आपल्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी म्हटले. काही वृत्तांनुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने किमान तीन वेळेस झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे.
यापार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेन सोडून पळून गेल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन सोडून पोलंडला आश्रय घेतल्याचे वृत्त रशियातील सरकारी वृत्तवाहिनी स्पुतनिकने केलाय. मात्र युक्रेनने हा दावा फेटाळला आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडला नसून ते अद्याप आपल्या देशात असल्याचे युक्रेनकडून सांगितले जातेय.