भिवंडीत कोनगाव पोलिसांची कामगिरी; साडे सहा लाख किमतीचे मोबाईल नागरीकांना केले परत

भिवंडीत कोनगाव पोलिसांची कामगिरी; साडे सहा लाख किमतीचे मोबाईल नागरीकांना केले परत

Published by :
Published on

अभिजीत हिरे | भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा उलगडा करून मोबाईल चोरीला गेलेल्या नागरीकांना सुखद धक्का देत तब्बल 6 लाख 87 हजार रुपये किमतीचे 52 मोबाईल नागरीकांना परत केले आहेत. भिवंडीत कोनगाव पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मागील दोन महिन्यात चोरी झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत हे सर्व मोबाईल चोरट्यांकडून महाराष्ट्रासह कर्नाटक ,उत्तर प्रदेश ,बिहार या राज्यातून जप्त करीत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आले.

मोबाईल आज सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला असून ज्याचा मोबाईल गहाळ अथवा चोरी होतो त्यावेळी ते हतबल झालेले असताना पोलिसांनी केलेल्या तपासातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

तर कोरोना काळात मुलांचा ऑनलाईन अभ्यास मोबाईलमध्ये सुरू असताना मोबाईल चोरीस गेल्याने मानसिक व आर्थिक फटका बसला होता परंतु पोलिसांनी आम्हाला आमच्या वस्तू परत करून दिल्याने मी स्वतः आनंद असल्याची प्रतिक्रिया नागरीक सुधाकर भोईर यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com