RBI Policy | RBI कडून रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर

RBI Policy | RBI कडून रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर

Published by :
Published on

कोरोना संकट आणि वाढता महागाई दर यापार्श्वभूमीवर रिझर्व बँकेकडून नव्या आर्थिक वर्ष 20121-22 मधील पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत. यावेळी रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर ठेवण्यात आला आहे. याची घोषणा होतात सकाळी निर्देशांकात वाढ दिसून आली.

पतधोरण आढावा समितीची सोमवारपासून बैठक सुरू होती. आज बैठक संपल्यानंतर शक्तिकांता दास यांनी पतधोरण जाहीर केलं. "करोनाचं संक्रमण वाढत असलं तरी अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने अनिश्चिततेतही भर पडली आहे. असं असलं तरी भारत आव्हानांवर मात करण्यासाठी तयार आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर ५ टक्क्यांवर होता," असं शक्तिकांता दास यांनी सांगितलं.

पतधोरण आढावा समितीनं रेपो रेट ४ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्केच निश्चित करण्यात आला आहे. करोनाच्या वाढत्या संकटामुळे अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा आव्हान उभी राहण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरी २०२१-२२ या आर्थिक वर्षात जीडीपी १०.५ राहणार असल्याचा अंदाज आयबीआयने व्यक्त केला आहे. मागच्या पतधोरणातही रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढीचा हाच अंदाज वर्तवला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com