Mansoon
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दुपारनंतर पावसाचा जोर वाढला
कोकणात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा धोका अजून कायम आहे. दापोलीत आज सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून आज रात्री उद्या उद्या अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठेही जी विधाने किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची घटना घडली नाही परंतु जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मात्र सतर्क आहे.