रत्नागिरीमधील मनोरुणालयात २० रुग्णांना कोरोनाची लागण

रत्नागिरीमधील मनोरुणालयात २० रुग्णांना कोरोनाची लागण

Published by :
Published on

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होत असतानाच एक चिंताजनक बाब समोर आली आहे. रत्नागिरी शहरातील मनोरुग्णालयात २० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून प्रत्येक रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुणालयातील तब्बल २० रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तेथील आरोग्य विभाग पुन्हा एकदा चांगलाच अलर्ट झाला आहे. जवळपास सर्व रुग्णांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

येथील महिला रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनोरुग्णालयाकडून देण्यात आली.कोरोना काळातही रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याचे काम सुरू होते. आतासुद्धा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून दररोज रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र दाखल करण्यापूर्वी त्यांचे आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिले जातात. असं असतानाही मनोरुग्णांना कोरोनाची लागण नेमकी कशी झाली, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com