Railway Recruitment | रेल्वेत मेगा भरती

Railway Recruitment | रेल्वेत मेगा भरती

Published by :
Published on

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका समाजातील सर्वच स्थरातील लोकांना लागला आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा गेल्या आहेत. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांची स्थिती अधिक बिकट आहे. अनेक युवक शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे ही रेल्वेतील पदभरती युवकांसाठी उत्तम संधी म्हणता येईल. रेल्वेत ट्रॅक मेन्टेनर (Track Maintainer) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

रेल्वे भरती मंडळाकडून (Railway Recruitment Board) लवकरच ग्रुप डी मधील या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. जर तुम्ही माध्यमिक शिक्षण आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्ही या पद भरतीसाठी अर्ज करु शकता.

शैक्षणिक पात्रता आवश्यक
माध्यमिक शिक्षण आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. संबंधित ट्रेड साठी आयटीआय (ITI) उमेदवारच पात्र ठरणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी इच्छूक उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबतची पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल वय 33 असावे. वयोमर्यादेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार नोटिफिकेशन (Notification) पाहू शकतात. नोटिफिकेशनमध्ये याची सविस्तर माहिती मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com