महसूल विभागाची धाड; अधिकाऱ्यांच्य़ा हातावर तुरी देऊन वाळू उपसा करणारे पसार

महसूल विभागाची धाड; अधिकाऱ्यांच्य़ा हातावर तुरी देऊन वाळू उपसा करणारे पसार

Published by :
Published on

गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली, कोपर, कल्याण, भिवंडी जवळील खाडीत दिवस-रात्र वाळूचा बेकायदेशीर (sand dredgers) उपसा सुरू होता. हा बेकायदेशीर उपसा (sand dredgers) रोखण्यासाठी महसूल विभागाने (revenue department) धाड टाकली होती. यावेळी आरोपी वाळू उपसा करताना आढळलेही, मात्र आरोपींचा बोटीने पाठलाग करताना उपसा बोटीवरून (sand dredgers) उड्या मारून 10 हून अधिक माफिया पोहत पसार झालेत. आता त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

कोपर,डोंबिवली आणि कल्याण मध्ये खाडीमध्ये मुंब्रा येथील वाळू माफिया (sand dredgers) हे वाळू उपसा जोमाने उपसा करत होते.ही खबर लागतातच अधिकाऱ्यांनी कारवाई साठी डोंबिवली पश्चिमेला खाडी किनारी धाड टाकली. आणि वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या (sand dredgers) बोटीच्या दिशेने प्रवास सुरू केला. कारवाई पथक आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच अधिकाऱ्यांना तुरी देऊन उपसा बोटीवरून वरून उड्या मारून 10 हून अधिक माफिया पोहत खाडी किनारी जाऊन पसार झाले आहेत. हा सर्व प्रकार अधिकारी आणि पोलिसांनी आपल्या व्हिडीओ मध्ये कैद केला आहे.

मुंब्रा येथील अली, कल्याणचा हे वाळू माफिया (sand dredgers) रेती उपशामधे अग्रेसर असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली आहे. आता त्यांना पकडण्याचे आवाहन आहे. दरम्यान कारवाई केलेल्या बोटीत तहसीलदार देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी माफियांच्या (sand dredgers) बोटीत प्रवेश केला. उपसा बोटीची गती कमी करून त्यामधली यंत्रसामुग्री गॅस कटरने तोडून टाकली, बोटीचे फाळके गॅस कटरने तोडून टाकले. यात 6 सक्शन पंप, 2 बार्ज व 12 ते 13 हौद असा एकूण 25 ते 30 लाखाचा माल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com