इन्फोसिस-पांचजन्य वादात रघुराम राजन यांची उडी; म्हणाले…

इन्फोसिस-पांचजन्य वादात रघुराम राजन यांची उडी; म्हणाले…

Published by :
Published on

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का, असा थेट सवाल आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी उपस्थित केला. 'इन्फोसिस'वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या 'पांचजन्य'मधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात राजन बोलत होते. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन बोलत होते.

'इन्फोसिस' कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक 'पांचजन्य' या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती.
मागील काही काळामध्ये सरकार किंवा सरकारच्या जवळच्या व्यक्तींकडून अनेक खासगी कंपन्यांवर किंवा त्यांच्याशीसंबंधित व्यक्तींवर बेछूट आरोप करण्यात आल्याचे प्रकार घडले असून 'इन्फोसिस' हे त्यामधील ताजे उदाहरण आहे."हे वक्तव्य काहीच कामाचं नाहीये असं मला वाटतं. कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगलं काम न करणाऱ्या सरकारला तुम्ही दोष देत देशविरोधी म्हणणार का? तुम्ही त्यांचं चूक म्हणता आणि लोक चुका करत असतात," असं मत राजन यांनी व्यक्त केलं. जीएसटी हे त्याचं उदाहरण असल्याचंही राजन यांनी म्हटलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com