सार्वजनिक बँका विकणे मोठी चूक – रघुराम राजन

सार्वजनिक बँका विकणे मोठी चूक – रघुराम राजन

Published by :
Published on

सार्वजनिक बँका खासगी उद्योगसमुहांना विकणं ही मोठी चूक ठरेल, असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. चालू पतधोरण व्यवस्थेत चलनवाढ रोखून आर्थिक वाढ साकार करण्याचं उद्दिष्ट आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. रोखे बाजारात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राजन यांनी म्हटलं आहे.

भारतानं 2024-25 पर्यंत पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था साकार करण्याचं ठेवलेलं उद्दिष्ट महत्त्वाकांक्षी आहे. कोरोना संकटाच्या आधी हे लक्ष्य ठेवताना काळजी घेतली गेली नाही. पतधोरण हे चलनवाढ खाली आणू शकते यावर आपला विश्वास आहे. रिझर्व्ह बँकेला लवचिकता दिल्यास अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो, असंही राजन म्हणाले.

सध्याची व्यवस्था ही चलनवाड कमी ठेवण्यास उपयुक्त आहे. कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारनं कर्जाच्या योजना आखल्या आहेत. तरीही एकूण आर्थिक स्थितीबाबत अनेक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे, असेही ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com